Khandesh College Education Society's
Moolji Jaitha College
"An Autonomous College Affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon."
NAAC Re-Accredited Grade "A" CGPA 3.15 (3rd Cycle) | UGC Honoured "College of Excellence"
"Star College" by Ministry of Science and Technology

About Yogic Science

Department of Yogic Science

Year of Establishment: UG 2008
PG 2013
Names of Programmes / Courses offered Intake capacity
B.A. (Yogic Science) (General ) One Division
B.A. (Yogic Science) (Special ) One Division
M.A. (Yogic Science) One Division
Diploma in Yoga Teacher One Division
Diploma in Naturopathy & Yogic Science One Division
Certificate in Yoga Teacher One Division
Certificate in Naturopathy and Yogic Science One Division
Diploma in Yoga Teacher (YCMOU Affiliated) One Division

Program specific outcomes

B.A. (Yogic Science)
1 To obtain the knowledge of yoga and yogic kriyas
2 To obtain the basic concept of anatomy, physiology, and naturopathy
3 To obtain the basic concept of anatomy, physiology, and naturopathy .
M.A. (Yogic Science)
1 To attain the complete knowledge of physical, mental, emotional, intellectual and spiritual path of yoga..
2 To get in depth knowledge of yogic Concept for personality development.
3 To qualifying as assistant professor, yoga teacher, yoga trainer.
4 To get the opportunities of employment and self employment in the field of yoga.
5 To obtain eligibility for NET,Ph.D, M.Phill.
Certificate Course in Yoga Teacher
1 To obtain basic knowledge of yoga and yogic kriyas.
2 To improve the interest in advanced yoga courses
3 To know the benefits of yoga practice
Diploma in Yoga Teacher
1 To enhance the physical mental and intellectual abilities.
2 To obtain eligibility as yoga teacher.
3 To improve personal, family and social health.
Certificate Course in Naturopathy & Yogic Science
1 To obtain basic knowledge of Naturopathy and yoga.
2 To know the basic concept of application of naturopathy.
3 To know the benefits of naturopathy.
4 To improve the interest in advance Naturopathy courses.
5 To improve Awareness of naturopathy.
6 To obtain eligibility as assistant in Naturopathy centre.
Diploma in Naturopathy & Yogic Science
1 To attain in-depth knowledge of Naturopathy and yoga.
2 To obtain the theoretical and practical knowledge of application of naturopathy.
3 To study the ancient and modern Naturopathy.
4 To increase the interest and awareness of naturopathy.
5 To obtain eligibility as assistant naturopath in Naturopathy centre.

Board of Studies in Yogic Science

Board of Studies in Yogic Science

Syllabus

Syllabus

Faculty/Staff:

Teaching:
01 Name Dr. Devanand S. Sonar
Qualification Ph. D. (Yogashastra) NET (Yoga) M. A. (Yogic Science) D. N. Y. S.
Designation Director & Asst. Professor
Experience 13 Years
Specialization Yogic Science
contact(email) devanandsonar@gmail.com
02 Name Prof. Pankaj P. Khajbage
Qualification M. A. (Yogic Science) D. N. Y. S.
Designation Asst. Professor
Experience 10 Years
Specialization Yogic Science
contact(email) pankajkhajbage@gmail.com
03 Name Prof. Jyoti D. Wagh
Qualification NET (Yoga) M. A. (Yogic Science) B.A. B.ed., D.Y.T.
Designation Asst. Professor
Experience 08 Years
Specialization Yogic Science
contact(email) Jyo19W@gmail.com
05 Name Prof. Anant S. Mahajan
Qualification M. Sc. (Yoga)
Designation Naturopath & Asst. Professor
Experience 09 Years
Specialization Yogic Science
contact(email) anantmahajan75@gmail.com
06 Name Prof. Sonal A. Mahajan
Qualification M. A. (Yogic Science)
Designation Naturopath & Asst. Professor
Experience 06 Years
Specialization Yogic Science
contact(email) Sonallunkad75@gmail.com

Teaching Plan

Sr. No. Title
1 Teaching Plan 2020-21

Alumni

Research

Achievements

Activities & Reports


* ज्ञानेश्र्वर माऊलींच्या  संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजीत मोगरा फुलला.....


- विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमांचा वार्षिक अहवाल- (२०१९-२०२०)

१) क. ब. चौ. उ. म. विद्यापीठात आयोजित कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण (१ ते १० जून) – क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. १ ते १० जून २०२० या कालावधीत आयोजित कार्यशाळेतील ५० विद्यार्थ्याना योग प्रशिक्षण देण्यासाठी विभागातील प्रा. पंकज खाजबागे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना शरीर व मन स्वास्थ्यासाठी उपयुक्त योगिक प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात आले.

२) हॅपी स्ट्रीट योगा (१६ जून) – आयुष मंत्रालयाद्वारे हॅपी स्ट्रीट योगा कार्यक्रमाचे आयोजन योग दिनानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभरात करण्यात आले होते. त्या अंतर्गत रविवार दि. १६ जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन विभागाच्या वतीने जळगाव शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले होते. त्यामध्ये १) शुभारंभ रेसीडन्सी, रुक्मिणी नगर २) रामचंद्र नगर, भुसावळ रोड ३) गाजरे हॉस्पिटल नवीन बस स्थानक जवळ ४) मायादेवी नगर, महाबळ ५) विजय कॉलनी ६) मू. जे. महाविद्यालय परिसर ७) क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर ८) बहिणाबाई चौधरी उद्यान या ठिकाणी हॅपी स्ट्रीट योगा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आयुष मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर सुद्धा विभागाद्वारे आयोजित या कार्यक्रमांची दखल घेण्यात आली. शहरातील जवळपास ८० ते १०० नागरिकांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून योग विषयक माहिती प्रात्यक्षिकासह जाणून घेतली.

३) आंतरराष्ट्रीय योग दिन योगाभ्यास प्रात्यक्षिक (२१ जून) – आंतरराष्ट्रीय योग दिन योगाभ्यास प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणातील बास्केट बॉल कोर्टवर सकाळी ७ ते ८ या वेळात करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. डी. डी. पाटील (सदस्य, के. सी. ई. सोसायटी), श्री. शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी, के. सी. ई. सोसायटी), डॉ. उदय कुलकर्णी (प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय), डॉ. डी. जी. हुंडीवाले (शिक्षण संचालक, के. सी. ई. सोसायटी), श्री. के. जी. फेगडे (शालेय शिक्षण समन्वयक, के. सी. ई. सोसायटी ), इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रा. देवानंद सोनार यांनी ४५० विद्यार्थ्यांकडून सामुहिक योगसाधना शासकीय प्रोटोकॉलनुसार करवून घेतली. त्याचबरोबर इतर कार्यक्रमांचेही आयोजन योग दिनानिमित्त करण्यात आले होते. जसे- १) भुसावळ येथील तुरुंगातील कैदी आणि अधिकाऱ्यांना योग प्रशिक्षण. २) दूरदर्शनच्या सह्यांद्री वाहिनीवर प्रा. आरती वि. गोरे यांची लाईव्ह मुलाखत. ३) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारा आयोजित योगासन चाम्पियनशिपमध्ये सहभाग आणि तन्मय नितीन गायकवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले.

४) रोटरी हॉलमध्ये बँक ऑफ बडोदाच्या वतिने व्याख्यान (२०/०७/२०१९) – बँक ऑफ बडोदाच्या वतिने रोटरी हॉल, मायादेवी नगर जळगाव येथे बँकेच्या ११२ व्या स्थापना दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० जुलै रोजी सकाळी ७ ते ८:३० या वेळात योग प्रात्यक्षिक व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निसर्गोपचार तज्ञ सौ. सोनाल महाजन यांनी प्रात्यक्षिकासहीत योगाची मीहीती दिली. सदर कार्यक्रमाला एकूण ८३ साधकांनी उपस्थिती दर्शविली.

५) क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा (६ ते २३ ऑगस्ट) – क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत Induction Program मध्ये दि. ६ ते २३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत रोज सकाळी ९:३० ते १०:३० या वेळात योग कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेला प्रा. पंकज खाजबागे यांनी मार्गदर्शन केले. विकास खैरनार यांचे सहशिक्षक म्हणून सहकार्य लाभले. या कार्यशाळेत ६० मुले आणि ३० मुली अशा एकूण ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ६) निसर्गोपचार दिनानिमित्त पंचमहाभूत उत्सव (१७/११/२०२०)- १८ नोव्हेंबर या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त निसर्गोपचार विभागाद्वारे दि. १७ नोव्हेंबर रोजी पंचमहाभूत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंचावर विभागाच्या संचालिका प्रा. आरती वि. गोरे, निसर्गोपचार तज्ञ समन्वयक प्रा. अनंत महाजन, समन्वयीका प्रा. सोनल महाजन, डॉ. देवानंद सोनार हे उपस्थित होते. पंचमहाभूत उत्सवामध्ये मृत्तिका स्नान, नैसर्गिक आहाराचा आनंद मेळावा, नैसर्गिक आहार घटक पोस्टर प्रदर्शनी, मुद्रा विज्ञान प्रदर्शनी, क्रोमो थेरपी, चुंबक चिकित्सा, दाबबिंदू चिकित्सा इत्यादींचा लाभ उत्सवामध्ये सहभागी अंदाजे ४० साधक आणि विद्यार्थ्यांनी घेतला. फळ आणि पालेभाज्यांची सुंदर रांगोळी, तोरण आणि सजावट हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. निसर्गोपचार दिनानिमित्त नैसर्गिक चिकित्सेचे विविध पॅकेजेस विभागाद्वारे जाहीर करण्यात आले.

७) हृदयरोग निदान नि:शुल्क कार्यशाळा (३०/११/२०१९) – निसर्गोपचार विभाग आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने के. सी. ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त नि:शुल्क हृदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन सकाळी ९ ते १२ या वेळात करण्यात आले होते. या कार्यशाळेत माधवबाग चे श्री. मिलिंद सरदार, आणि डॉ. प्रशांत याकुंडी (मुंबई) यांनी उपस्थितांना पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून हृदयरोग विषयक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत ३८ साधकांनी सहभाग नोंदविला.

८) आंतर विभागीय योग स्पर्धा (१२/१२/२०१९) – क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार विभागांची आंतर विभागीय योग स्पर्धा दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी योग विभागात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, एरंडोल, या चार विभागातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या शुभारंभासाठी शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी, के. सी. ई. सोसायटी), डॉ. सी. पी. लभाने ( जिमखाना समिती प्रमुख), प्रा. आरती वि. गोरे (संचालिका योग विभाग), डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (संचालक, एकलव्य क्रीडा संकुल) डॉ. देवानंद सोनार आणि क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

१०) भुसावळ येथील जेष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी योग निसर्गोपचाराचे मार्गदर्शन (डिसें-जानेवारी) – दि. २५/१२/२०१९ बडींग प्रोजेक्ट च्या योग शिबिराअंतर्गत योग- निसर्गोपचार आणि आरोग्य या विषयांतर्गत योगाचे महत्व सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी च्या संचालिका प्रा. आरती वि. गोरे यांनी मारागादर्शन केले. निसर्गोपचार आणि आहाराचे वृद्धापकाळातील आरोग्यासाठी महत्व याविषयी व्याख्यान आणि प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थित जेष्ठ नागरिकांना निसर्गोपचार समन्वयक प्रा. सोनल महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक उपचारांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याबद्दलची माहिती आणि महत्व प्रा. अनंत महाजन यांनी जेष्ठ नागरिकांना पटवून दिले. यावेळी साधारणत: १०० ते १२५ जेष्ठ स्त्री - पुरुष नागरिकांची उपस्थिती होती. दि. ३१/१२/२०१९ रोजी भुसावळ येथील जैन मंदीर आयोजित नि:शुल्क रुग्ण तपासणी शिबिरात प्रा. अनंत महाजन यांनी रुग्णांना वैयक्तिकरीत्या योग- निसर्गोपचाराचे मार्गदर्शन केले. या शिबिराचा एकूण १२२ जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. दि. ५/१/२०२० ला भुसावळ येथील दिगंबर जैन मंदिर येथे योगाचे जीवनात महत्व या विषयावर प्रा. सौ. आरती गोरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच निर्गोपचार व आहाराचे आरोग्यासाठी महत्व या विषयावर प्रा. सौ. सोनल महाजन मॅडम यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निसर्गोपचारातील बाह्य प्रात्यक्षिकासाहित उपचार संपूर्ण मार्गदर्शन प्रा. अनंत महाजन सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये २००-२५० स्री-पुरुष संख्या यांची उपस्थिती होती. दि. ७/१/२०२० रोजी भुसावळ येथे मातृभूमी चौकात आयोजित संत चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताह मध्ये योग व निसर्गोपचार कार्यशाळेचे आयोजन सायंकाळी ४ ते ६ या वेळात करण्यात आले होते. यावेळी मंचावर श्री. किरण कोलते ( नगर सेवक, भुसावळ) ह. भ. प. बाविस्कर महाराज ( कथावाचक) हे मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेत डॉ. देवानंद सोनार यांनी योग साधनेची आवश्यकता याविषयावर मार्गदर्शन केले तर प्रा. अनंत महाजन (निसर्गोपचार तज्ञ) यांनी पंचभौतिक चिकित्सेविषयी प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अंदाजे 250महिला - पुरुषांनी सहभाग नोंदविला.

११) All India Inter University Yoga Championship 2019-20 मध्ये सहभाग (६-१० जाने. २०) - दि. ६ ते १० जानेवारी, आंतर विद्यापीठ स्तरीय योगा स्पर्धा २०१९-२० या स्पर्धेचे आयोजनRajeev Gandhi University of Knowledge & Technology Nuzwid, Andhrapradesh येथे करण्यात आले. या स्पर्धेत भारतातून १५७ विद्यापीठ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अव्वल कामगिरी करत क.ब. चौ. उ. म. वि. महिला गटाने भारतातून ७ वा क्रमांक तसेच तसेच महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळविला. या सर्व उत्तम कामगिरीत विद्यापीठ प्रशिक्षक म्हणून प्रा. पंकज खाजबागे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मू. जे. च्या योग विभागाचे सहकार्य लाभले.

१२) दिल्ली येथे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान बैंगलोर तर्फे आयोजित परिषदेमध्ये सहभाग - दि. २३/०१/२०२० रोजी दिल्ली येथे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान बैंगलोर तर्फे Inter University centre for yoga Science (IUC – YS) वर्कशॉप दिल्ली येथे झाला. ह्यावेळी माननीय HRD Minister डॉ. रमेश पोखरीयाल जी, UGC चे अध्यक्ष डॉ. डी. पी. सिंग, UGC चे सचिव डॉ. रजनिस जैन, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान बैंगलौर चे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र उपस्थित होते. सदर वर्कशॉप मध्ये विविध विद्यापिठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि योगविषयक विद्यापीठ प्रतिनिधी आणि योगविषयातील विविध तज्ञ उपस्थित होते. सदर परिषदेमध्ये प्रा. आरती गोरे आणि प्रा.अनंत महाजन यांनी उपस्थिती दर्शविली.

१३) रथसप्तमी (सूर्यनमस्कार दिन) निमित्त सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार कार्यक्रम (१/०२/२०२०) : ‘चला सुदृढ व निरोगी आयुष्यप्राप्ती साठी सूर्यनमस्कार घालू या’. या संकल्पने अंतर्गत सूर्यनमस्कार दिनानि मित्त मू.जे. महाविद्यालयाच्या मानवी मूल्य प्रशाळे अंतर्गत सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नँचरोपँथी, आणि वेद इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार’ ह्या संकल्पनेनुसार सूर्यनमस्कार दिनाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (संचालक, एकलव्य क्रीडा संकुल), प्रमुख वक्ते डॉ. व्ही. एस. कंची (ग्रंथालय प्रमुख तथा तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक), विशेष अतिथी श्री. गिरीधर नेमाडे (कॅबिनेट सेक्रेटरी) उपस्थित होते. सूर्योदय ते सूर्यास्त योग विभागात आलेल्या साधकांकडून सूर्य नमस्कार शास्रशुद्ध पद्धतीने करून घेण्यात आले.

१४) “ध्यान आणि मेंदू विज्ञान” एक दिवसीय कार्यशाळा (२२/२/२०२०) दि. २२/२/२० रोजी मू. जे. महाविद्यालय (स्वायत्त) जुना कॉन्फरन्स हॉल येथे मानवी मुल्ये प्रशाळा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा “ध्यान आणि मेंदू विज्ञान” कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. यशवंत वेलणकर यांनी “ध्यान आणि मेंदू विज्ञान” या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

१५) हरिद्वार येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग परिषदेत सहभाग (दि. १८ ते २५ फेब्रु. २०२०) : इंडियन योग असोसिएशन च्या वतीने, उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालय हरिद्वार येथे सहाव्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन दि. २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या परिषदेत विभागातील प्राध्यापकांसहीत ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परिषदेत विभागातील डॉ. देवानंद सोनार, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. जास्मिन गांजरे यांनी शोध निबंध सादर केलेत. प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे, योगशिक्षिका सौ. रत्नप्रभा चौधरी, सौ. डिम्पल रडे यांनी सहभाग नोंदविला.

१६) महिला दिनानिमित्त महिला आरोग्य या विषयावर व्याख्यान : दि. ११/३/२०२०, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी महिला दिनानिमित्त महिला आरोग्य या विषयावर डॉ. रुपाली बेंडाळे (स्री रोग तज्ञ) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रा. आरती गोरे उपस्थीत होत्या.




आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रसंगी योगसाधना करताना उपस्थित मान्यवर.


आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रसंगी योगसाधना करताना उपस्थित विद्यार्थी.


निसर्गोपचार दिनानिमित्य आयोजित पंचमहाभूत उत्सव कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी सर


हृदयरोग निदान कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना हृदय रोग तज्ञ श्री. मिलिंद सरदार

सूर्यनमस्कार दिनानिमित्य आयोजित सूर्योदय ते सूर्यास्त कार्यक्रमात सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी आणि कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

भुसावळ येथे आयोजित योग – निसर्गोपचार कार्यशाळेत निसर्गोपचाराचे प्रात्यक्षिक दाखविताना निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन.

Content Developed

News & Events

Contact Us

Contact person
Name Dr. Devanand Sonar
Designation Director & Asst. Professor
E-mail sohamdyn@kces.in
Mobile No. 9970985954
7721986225
Address Soham Department of Yoga & Naturopathy,
Ground floor, Girls Hostel,
M. J. College, Campus, Jalgaon 425001.
Scroll To Top